प्रतीक्षा संपली!पुण्याला मिळणार 10 वी महिला महापौर, येत्या 30 -31 जानेवारीला अधिकृत घोषणा..

पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.सर्वाधिक उस्तुकता लागलेल्या पुणे महानगरपालिकेचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले.या महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहेत. कारण येत्या 30 किंवा 31जानेवारीला पुण्याला नवा महापौर मिळणार आहे.

पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे यांच्यासह इतर महिला नगरसेवकांची महापौर होण्याची संधी वाढली आहे. महापालिकेतील 165 जागांपैकी तब्बल 119 जागांवर भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने एकहाती सत्ता मिळविली आहे.पुण्याला लवकरच 10 वी महिला महापौर मिळणार आहे.
पुणे महापालिका महापौर -उपमहापौर निवडीचा कार्यक्रम असा असणार हॆ जाणून घेऊया..

22 जानेवारी: महापौर पदाचे आरक्षण
23 जानेवारी: नगरसचिवांनी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता निर्वाचित सदस्यांची बैठक बोलवण्यासाठी तारीख आणि वेळ निश्चितीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार
24,25 जानेवारी: विभागीय आयुक्त यांनी महापालिकेच्या प्रथम सभेची तारीख आणि पीठासन अधिकारी निश्चित करणार
27,28 जानेवारी: महापौर, उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देश पत्र महापालिका सचिवांना केलं जाणार सदर
30, 31 जानेवारी: महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येणार
दरम्यान यंदा महापालिकेच्या सभागृहात सर्व पक्षांचा विचार केला तर एकूण 67 महिला नगरसेविका उपस्थितीत असणार आहेत. यामधील एक नगरसेविका पुण्याची महापौर होणार आहे. आता महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान कुणाला मिळतोय हे पाहणं महत्वाचे ठरेल.
