मुंबईत राजकीय भूकंप! मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पोस्टने वातावरण तापलं ; बाळासाहेबांची शपथ…


मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला मनसेना पाठिंबाला दिल्याने खळबळ उडाली असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की,राजकारणात कधीतरी मीं थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं.त्यांच्यासारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाहीअसेही राज ठाकरे यांनी म्हटले.

महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे लढवल्या मात्र ठाकरे बंधूंना अपयश आले. तर, मनसेचे अवघे ६ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर आता राज ठाकरे हे कल्याण-डोंबिवलीनंतर मुंबईतही पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. राज यांनी बाळासाहेबांच्या भूमिकांबाबत भाष्य करताना त्यांनी कधीही मराठीच्या मुद्यावर तडजोड केली नसल्याकडे लक्ष वेधले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!