वातावरण तापलं! बेट्या जेवढं तुझं वय आहे ना…, भाजपचे माजी मंत्री अन अजित पवारांच्या आमदारात जुंपली

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. या निवडणुका तोंडावर असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच बाळा भेगडेना भाजपमध्ये कोण विचारते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कोणाला किती किंमत दिली जाते? भाजपच्या वारिष्ठांकडून युतीबाबत मला का विचारणा होते? असे म्हणत शेळकेनी भेगडेंची खिल्ली उडवली होती.
यावरच आता बाळा भेगडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. बेट्या जेवढे तुझं वय आहे ना…. मी असं बोललो नाही आणि मला असं बोलायचं नाही. एकच सांगतो माझं दैवत देवा भाऊ आहे. तुम्हाला आमची ताकद बघायची आहे ना सात तारखेनंतर तुमची टिकटिकच बंद करतो असं म्हणत पलटवार केला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, आमची ताकद दाखवून देतो. नंतर बाळाभाऊ बाळाभाऊ मामा मामा करू नको.. आत्ता मामा जागा झाला. असा जोरदार प्रहार बाळा भेगडे यांनी केला. यापुढे आमदार तूला भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोन येणार नाही. बाळा भेगडेचा शब्द आहे असे म्हणत त्यांच्यात चांगलीच जुंपली.