उरुळीकांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात भाजपकडून दोघांना पक्षाचे एबी फॉर्म; पक्षाने निष्ठावंताच्या ऐनवेळी केलेल्या घाताने कार्यकर्ते संतप्त…

उरुळीकांचन :पुणे जिल्हा परिषदेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उरुळीकांचन -सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात भाजपने नाट्यमयरीत्या आपल्या अधिकृत उमेदवाराची चांगलीच गोची केली असून ऐनवेळी राष्ट्रवादीने डावलेल्या उमेदवाराच्या हाती पक्षाचा दुसरा अधिकृत एबी फॉर्म दिल्याने भाजपमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या लेखी पत्र या उमेदवाराला मिळाल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरून पक्षाचा अधिकृत उमेदवार कोन म्हणून उद्याचा अर्ज पडताळणीकडे लक्ष लागून राहिले आहे.

उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात भाजपने अर्ज भरण्याचा अंतिम दिनी (दि.२१) जिल्हाध्यक्षांच्या एबी फॉर्मच्या एका उमेदवाराला तर दुसऱ्याला नंतर असा एबी फॉर्मचा फॉर्मुला वापरला आहे. पक्षाने शेवटच्या दिवशी उमेदवार म्हणून जीवन शिंदे यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र त्याच दिवशी नाट्ययम घडामोडी घडीत पक्षाने राष्ट्रवादीतून ऐनवेळी डावलेल्या शंकर बडेकर यांचा ऐनवेळी विचार करुन त्यांनाही उमेदवार देऊ केल्याने पक्षाच्या दोन एबी फॉर्मने भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे.
ऐनवेळी येऊन शंकर बडेकर यांना अधिकृत उमेदवारीचे पत्र दिल्याने उमेदवारीचा संभ्रम कायम झाला आहे. अधिकृत म्हणून शंकर बडेकर यांचा अर्ज कायम होणार असले तरी उद्याचा अर्ज पडताळणीकडे लक्ष लागून राहणार आहे.

दरम्यान उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा व पंचायत समितीच्या गट व गणांत प्रतिष्ठेची लढाई होत आहे. या गटात राष्ट्रवादीने जितेंद्र बडेकर यांना तर भाजपने जीवन शिंदे व शंकर बडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत व सायंकाळपर्यंत मान अपमानाचे नाराजी नाट्य सुरू झाले आहे .पक्षाला या गटात बंडाळीचा सामना करावा लागत असल्याने पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा भावनेशी खेळण्याचा प्रयत्न केल्याने मूळ कार्यकर्ते प्रचंड संतापले आहे.
