मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या प्रलंबित हप्त्यासाठी तब्बल 393.25 कोटींचा निधी मंजूर, डिसेंबरचा हप्ता लवकरच?


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महिलांनी ई- केवायसी करून देखील त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनीं सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रलंबित असलेल्या हप्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 393,25 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे

सामाजिक न्याय विभागाने योजनेसाठी 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 960कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे लाडक्या बहि‍णींना डिसेंबर 2025 या महिन्याचा हप्ता मिळू शकणार आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या कारणामुळे जानेवारी 2026 या महिन्याचा हप्ता देण्यास मज्जाव केला होता. मात्र आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात खडखडाट होणार आहे.

जानेवारी महिन्यात डिसेंबर 2025 महिन्याचा लाभ देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे.अखेरीस महिला व बाल विकास विभागाने लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यास सांगितले होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. ज्या महिलांना लाभ मिळाले नाहीत, त्यांना डिसेंबर 2025 महिन्याचा लाभ जानेवारी 2026 मध्ये मिळेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान दुसरीकडे मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील ज्या काही कारणास्तव योजनेतील महिलांच्या केवायसी प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!