मोठी बातमी! शिवसेना पक्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर? त्या ट्विटमुळे खळबळ, नेमकं घडतंय काय?


नवी दिल्ली : शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे गट असे दोन गट तीन वर्षांपूर्वी पडले असून मूळ शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? या मुद्यावर गेल्या बऱ्याच काळापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे.

या खटल्याचा निकाल लवकरच लागले, उद्याच अंतिम निकाल येईल असं वाटत राहतं, मात्र सतत तारीख पे तारीख सुरू आहे. अखेर आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी सुरू करण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाने मागल्या तारखेल सांगून ठेवलं होतं.

मात्र आता आजची सुनावणी देखील होण्याची चिन्ह अतिशय कमी आहेत. याप्रकरणी ठाकरेंची बाजू मांणारे ॲड. असीम सरोदे यांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हा अंदाज व्यक्त केला आहे.

आज “शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह” याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही असे सरोदे यांनी म्हटले आहे. त्यामुळेच शिवसेना मूळ कोणाची, धनुष्यबाण नेमका कोणाला मिळणार याचा निकाल अद्याप लांबणीवरच असल्याचे दिसते.

सर्वोच्च न्यायालायने आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु करू असे मागच्या तारखेला सांगून ठेवले होते. अगदी कुणी किती वेळ युक्तिवाद करणार हे सुद्धा सांगितले होते. आज ११.३० वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!