ब्रेकिंग! मुंबईचा महापौर राजधानी दिल्लीत ठरणार ; भाजप नेत्यांसह शिंदेंचे शिलेदार तातडीने रवाना

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निकालानंतर महापौर पदावरून भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण ठरणार याचा फैसला आता मुंबईत नाही तर देशाची राजधानी दिल्लीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी भाजप नेत्यांसह शिंदेचे शिलेदार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे.

मुंबईतील सत्ता वाटपावर तोडगा काढण्यासाठी तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात निर्माण झालेला तोडगा मिटवण्यासाठी
एकनाथ शिंदे यांचा शिलेदार नवी दिल्लीत दाखल झाला आहे.भाजपचे राज्यातील आणि मुंबईतील नेतृत्व दिल्लीत दाखल झाले आहे. आता दिल्लीतच मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपावर तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. तिथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार असून, मुंबईच्या सत्तेचं ‘वाटप’ फायनल होण्याची शक्यता आहे.

भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी बहुमतापेक्षा कमी आहेत. तर, दुसरीकडे शिंदे गटाने अडीच वर्षासाठी महापौर पद मागितले आहे. सत्ता वाटपाचा तिढा कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना तीन दिवस मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यावर भाजपने आपल्या पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
