मुंबईत अग्नितांडव! वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसने घेतला अचानक पेट अन….


मुंबई : मुंबईतील अत्यंत रहदारीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खाजगी ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आग इतकी भयानक होती की, आगीच्या ज्वाळांसोबतच बसमध्ये मोठे स्फोट झाले आणि अवघ्या काही वेळात बस जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, अत्यंत रहदारीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरातून जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागली. या आगीचा भडका इतका होता की, ज्वालासोबत मोठ मोठे स्फोट ऐकू येत होते.त्यामुळे महामार्गावरील इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील लोक वेळीच सुखरूप बाहेर पडले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बसने अचानक पेट घेतल्याने शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समता नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!