मुंबईत राजकीय घडामोडींना वेग ; शिंदेंच्या २५ नगरसेवकांनी वाढवलं टेन्शन, त्यांच्याही मनात मशाल….

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी पाऊले उचलली आहेत. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. यापैकी आता 25 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंचा टेन्शन वाढवल आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, शिंदेंचे २९ नगरसेवक ज्या हॉटेलमध्ये आहेत, त्याच हॉटेलमध्ये मी आज जेवणासाठी जाणार आहे. भाजपचा महापौर व्हावा, असे एकनाथ शिंदे यांनाही वाटत नाही. शिंदेसेनेचे निवडून आलेले नगरसेवक मूळचे मराठी आहेत, शिवसैनिक आहेत. त्यांच्याही मनात मशाल धगधगतेय असे स्पष्ट म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जसे बंड केले तसे बंड त्यांच्या पक्षातील लोकांनाही करण्याचा अधिकार आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हीच सर्वांची इच्छा आहे, असे संजय राऊत म्हणाले.विशेष म्हणजे शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांपैकी २५ मराठी नगरसेवक आहेत, ही बाब संजय राऊत यांनी अधोरेखित करून सांगितल्याने एकनाथ शिंदेंचा टेन्शन वाढल आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या 25 नगरसेवकांशी संजय राऊंताची पडद्याआड काही चर्चा सुरू आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे. त्यामुळे ‘त्याच’ २५ मराठी नगरसेवकांनी दस्तुरखुद्द शिंदे यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेमध्ये अंतर्गत कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे
