भाजपला धक्का ; महापौर पद येणार अडचणीत? शिंदेंनंतर आणखी एका नेत्याने केली अडचण

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र आता भाजपच महापौर पद अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अमरावती महानगरपालिका निवडणुकीत 25जागांसह भाजप त्यापाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणा 15 जागा मिळवून रवी राणा सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे भाजपचे कोंडी होणार आहे.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत,25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सत्तेच्या चाव्या मिळवणं भाजपसाठी अवघड ठरत आहे.याठिकाणी भाजपला बहुमतासाठी 19 नगरसेवकांची गरज आहे. भाजपचे मित्र पक्ष असलेल्या युवा स्वाभीमानी पक्ष आणि अजित पवार गटाकडे तितकं संख्याबळ देखील आहे. मात्र या दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि टोकाचे मतभेद चव्हाट्यावर आल्याने भाजपचं महापौरपद अडचणीत आलं आहे.
दरम्यान रवी राणा भाजपला पाठिंबा देताना ते स्थायी समिती सभापती’ पदाची मागणी करण्याची शक्यता आहे. महापालिकेत तिजोरीच्या चाव्या राणांकडे गेल्या तर आपल्याला काय मिळणार? यावरून अजित पवार गट सत्तेत जाण्यास इच्छुक नाही. तसेच राणांकडे तिजोरीच्या चाव्या देण्यास भाजप कितपत इच्छुक असेल? तर भाजपला मोठा फटका बसणार आहे.

अमरावती महापालिकेत भाजपने 25 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला 15जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 11 आणि शिवसेना (शिंदे गट) 3जागांवर विजयी झाला आहे. 87सदस्यसंख्या असलेल्या अमरावतीत बहुमताचा आकडा 44 आहे. आता भाजपला 19 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे भाजपला महापौर पद मिळणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
