पराभव जिव्हारी! महापालिका निवडणुकीनंतर आता अजित पवार झेडपीसाठी पुण्याच्या मैदानात, थेट इच्छुकांच्या मुलाखती…

पुणे : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीतील अपयशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. या महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात पक्ष मोठा ठरला आणिअजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील बारामती होस्टेलवरती झेडपीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीची तयारी अजित पवारांनी सुरू केली आहे.मात्र अजित पवार ही निवडणूक नक्कीच स्वतः लढणार की परत शरद पवारांचा हात पकडणार की युती म्हणून भाजपा सोबत लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या पक्षाला मोठं अपयश मिळालं. अजित पवारांनी महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथेच त्यांना फटका बसला आणि पिंपरी चिंचवडसह पुणे महापालिका त्यांच्या हातून गेली. त्यानंतर आता अजित पवार जिल्हा परिषद निवडणूक साठी मैदानात उतरले आहेत.

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठंमोठ्या नेत्यांना भाजपात घेतले आणि मोठी खेळी करत सूत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत निवडणुका लढल्या. अजित पवार यांना याचा फटका देखील बसला. आता झेडपीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास अजित पवार यांनी सुरुवात केली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.