उद्धव ठाकरेंनी राज आणि मनसेचा केवळ वापर केला ; मनसेतून बाहेर पडलेल्या संतोष धुरींचा हल्लाबोल


पुणे : महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मागील 25 वर्षांपासून मुंबईवर सत्ता असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही मागे टाकत भाजपने मुबंईत सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. मात्र मनसेला यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. यावर आता मनसेची साथ सोडून भाजपात प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांनी प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन लढलेल्या निवडणुकीमध्ये 71 जागा जिंकल्या. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती पराभूत झाली असली तरी मात्र मनसेच्या स्वत:च्या केवळ 8 जागा निवडून आल्या आहेत.

यावरुनच बोलताना संतोष धुरी म्हणाले,उद्धव ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंचा केवळ वापर केला. राजसाहेब, कधीपर्यंत लोकांना जिंकवून देणार? आपल्या पक्षातील लोकांचं काय?” असा सवाल धुरींनी राज ठाकरेंना विचारला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची साथ सोडून संतोष धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या निवडणुकीतील पराभवावर बोलताना ते म्हणाले, मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी भाजपच येणार असं भाकीत केलं होतं. मनसेची चेष्टा झाली कुटुंब एकत्र आले तरी सहा जागा यापूर्वी आठ जागा मनसे जिंकले होते.यावेळेस उद्धव ठाकरेंनी फक्त राज ठाकरेंचा वापर करुन घेतल्याचा टोला संतोष धुरी यांनी लगावला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!