मुंबई जिकंताच मुख्यमंत्री फडणवीसांचा कोणाला तातडीने फोन? कॉलची सर्वत्र चर्चा


मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकापैकी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने विजयी पताका फडकवला आहे.ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती.दरम्यान, आता मुंबई जिकंताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन कॉल केला आहे. या फोन कॉलची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांना कॉल केला असल्याची माहिती समोर आली आहे.‘अमित तुमचं खूप खूप अभिनंदन. आता काहीही चिंता करायचं कारण नाही. तुम्ही फार सुंदर काम केलं. तुमचं खूप अभिनंदन आहे. आता आपण जबरदस्त करूया,’ असे देवेंद्र फडणवीस या कॉलदरम्यान म्हणाले आहेत.या कॉलची आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यातील 95 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर तर 30 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.आता मुंबईचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित साटम यांना कॉल केला आहे. बहुसंख्य महापालिकांत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!