पुण्याच राजकारण गुन्हेगार चालवणार; उमेदवारांनीं थेट तुरुंगातून मारली बाजी, कोण आहेत त्या?

पुणे: सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे महानगरपालिकेचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.पुण्यातील सर्वात अतितटीची लढत प्रभाग क्रमांक 23 मध्ये पहायला मिळाली. सोनाली आंदेकरची सून आणि बंडू आंदेकरची वहिनी असलेल्या लक्ष्मी आंदेकरने जेलमधून बाजी मारली आहे.

पुणे महानगरपालिकेत पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 (क) मध्ये लक्ष्मी आंदेकरला तिकीट देण्यात आलं होतं. गडाळे ऋतुजा तेजस यांच्याविरुद्ध लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीने तिकीट दिलं होतं. तर कल्याणी गणेश कोमकर ही देखील अपक्ष म्हणून उभा होती.
अखेर या निवडणुकीत लक्ष्मी आंदेकरने प्रभाग क्रमांक 23 (क) मधून विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून लक्ष्मी आंदेकरने दणदणीत विजय मिळवला.
या पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपच्या ऋतूजा गडाळे यांना 9752 मतं मिळाली असून लक्ष्मी आंदेकरला 9833 मतं मिळाली. यामध्ये लक्ष्मी आंदेकरचा फक्त 81 मतांनी विजय झाला. सासूनंतर आता सुनेचा देखील विजय झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी या चुरशीच्या लढतीत बाजी मारली आहे. त्यांना एकूण 10,809 मते मिळाली असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली. त्यांच्यापुढे ठाकरे आणि शिवसेना गटाचे प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत आंदेकर यांनी बाजी मारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्याचा राजकारण आता गुन्हेगार चालवणार का ?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, लक्ष्मी आंदेकर जामीन प्रकरणावर 16 तारखेला म्हणजे आज अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता लक्ष्मी आंदेकरला जामीन मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
