मुंबईचा पहिला कल हाती, महायुती की ठाकरे? पाहा कोण आघाडीवर, धक्कादायक आकडेवारी आली समोर….

मुंबई: सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीचे कल दिसून आले आहेत.

सुरुवातीच्या कलानुसार ठाकरेंची शिवशक्ती युती आणि भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महायुतीमध्ये चुरस सुरू असल्याचे दिसून येत आहे. महायुतीने सुरुवातीला आघाडी घेतली आहे. यामुळे ठाकरेंना धक्का मानला जात आहे. आज शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे
असणार आहे.
एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम सुरू राहणार आहे. शिवडी, दादर आणि माहिम यांसारख्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात ‘ठाकरे-राज’ युती आणि शिंदे गटात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. भाजप 12 शिंदेंची शिवसेना 10 ठाकरे 12, मनसे 6 काँग्रेस 5 अशा जागा पुढे आहेत.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी, आता एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता ती दोन वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
