राज्य निवडणूक आयोगाने मार्कर शाईचे’ ते’ आरोप फेटाळले; काय दिले स्पष्टीकरण…

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान होत आहे. या मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून आणि सर्वसामान्यांकडून करण्यात आला आहे. यावर आता राज्य निवडणूक आयोगाने विरोधकांचे आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिल आहे.शाई सुकल्यानंतर पुसली जात नाही आणि २०११ पासून तीच शाई वापरली जात असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केल आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग वापरत असलेला मार्कर पेन आणि शाई आम्ही वापरत आहे. २०११ पासून हीच शाई आणि मार्कर पेन पावरला जातोय. सुकल्यानंतर ही शाई पुसली जात नाही, असे दिनेश वाघमारे यांनी ठामपणे सांगितले. त्याशिवाय विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला आहे.


पुढे बोलताना ते म्हणाले,आम्ही सत्ताधाऱ्यांना कोणतीही मदत करत नाही, निष्पक्ष निवडणुका घेतल्या जात असल्याचे स्पष्टीकरणही वाघमारे यांनी दिले आहे. गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.२०११ पासून तोच मार्कर वापरला जात आहे.
या महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळीच का फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न उरत नाही. आयोग निष्पक्ष काम करत आहे. आम्ही कुणाला फेवर करत नाही. मुद्दाम संभ्राम तयार केला जातोय. फेक नरेटिव्ह तयार केला जातोय. सर्व आयोगावर ढकलले जात आहे, असे स्पष्ट वाघमारे यांनी म्हटलं आहे
