ब्रेकिंग! महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात, जनतेचा कौल कोणाला असणार? कोणत्या सुविधा सुरू अन बंद?


पुणे:राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार असून उद्या म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील या महापालिकेवर कोणाची सत्ता येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

कोणत्या महानगरपालिकांसाठी होणार मतदान?

बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर

आज होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशात मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईसह 29 महानगरपालिका समाविष्ट आहेत. मतदान सुरळीत पार पडावे आणि मतदारांचा सहभाग वाढून पर्यायी मतदानाचा टक्का वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे.

राज्यातील निवडणुका शांततेत पार पाडाव्या यासाठी आजकार्यालये आणि संस्था,सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, महामंडळे आणि मंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,बँकाबीएमसीच्या अधिकारक्षेत्रात स्थित केंद्र सरकारची कार्यालये, अनेक खाजगी कार्यालये देखील बंद राहणार आहेत.तसेच सरकारी आणि महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

दरम्यान मुंबई येथे मुख्यालय असलेले BSE आणि NSE 15 जानेवारी रोजी म्हणजेच आज संपूर्ण सुट्टी असणार आहे. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि कमोडिटीजमध्ये (सकाळच्या सत्रात) कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध असणार आहेत.यामध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, पोलिस आणि अग्निशमन विभाग पूर्णपणे कार्यरत असतील.तसेच लोकल ट्रेन आणि बेस्ट बस नेहमीप्रमाणे धावतील, ज्यामुळे मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचता येईल. मतदानावर सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाने 13 ते 16 जानेवारी असे चार दिवस ‘ड्राय डे’ जाहीर केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!