ब्रेकिंग! जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? बड्या नेत्याचे निवडणूक आयोगाला पत्र


पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रदीर्घ काळ रखडलेला मार्ग मोकळा झाला. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता नवा पेच निर्माण झाला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेडगे यांनी या निवडणुका पुढील ढकलण्याची मागणी करणारे पत्र आयोगाला लिहले आहे. यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी धनगर, बहुजन समाजाच्या कुलस्वामिनी चिंचणी मायाक्का देवी यात्रेमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी पत्रात केली आहे.ही वार्षिक पवित्र यात्रा कर्नाटक क महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येते.

5 फेब्रुवारी 2026 हा यात्रेचा प्रमुख दिवस असून या दिवशी महाराष्ट्रातील लाखो भक्त आपल्या कुटुंबासहित लाखोंच्या संख्येने या यात्रेस सहभागी होतात. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावर आता आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. 16 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर 7 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा सावट आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!