मतदानाच्या आधीच वातावरण तापलं! नालासोपाऱ्यात 10 लाखाची रोकड जप्त, भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप..


पुणे : महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना नालासोपारा विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानापूर्वीच मध्यरात्री 10 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.यावरून आता बहुजन विकास आघाडीने थेट शिवसेना आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील पेल्हार ब्रिज परिसरात मध्यरात्री पोलीस गस्त घालत असताना दोन तरुण गाड्यावरून संशयास्पद रित्या जात असल्याचा त्यांना आढळून आलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिशवी आढळली. त्या पिशवीत 10 लाख 9 हजार इतकी रक्कम होती.
या पैशांबाबत तरुणांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच पैशांचा मोठा गैरव्यवहार नालासोपारा मतदारसंघात समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपकडून हे पैसे वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी १० लाख ९ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन ॲक्टिव्हा दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध करत सत्ताधारी पक्षाकडून सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, सत्ताधारी गटाने हे आरोप फेटाळून लावले असून हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!