ताम्हणी घाटात रक्ताचा सडा ; तरुणावर मित्रांकडूनच धारदार शस्त्राने सपासप वार, पोलिसांनी केला 8 तासात उलगडा


पुणे : माणगाव -पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात तरुणाच्या खुनाचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. पुण्याहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या एका 22 वर्षीय तरुणावर त्याच्याच मित्रांनीच कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे.माणगाव पोलिसांनी अवघ्या 8 तासांत या हत्याकांडाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,आदित्य गणेश भगत हा तरुण आपल्या अनिकेत वाघमारे, तुषार पोटोळे आणि प्रज्वल हंबीर या तीन मित्रांसह इनोव्हा क्रिस्टा कारने महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाला होता. या प्रवासादरम्यान या मित्रांच्या जोरदार वाद झाला.
पैशांच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या मित्रांच्या सोबत झालेला वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी धावत्या कारमध्येच दोरीने आदित्यचा गळा आवळला.त्याला ओढत नेत कोयत्याने त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर सपासप वार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह तिथेच टाकून आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने स्थानिक ठिकाणी दाखल झाले.

तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह पाहून पोलिसांचा थरकाप उडाला. आरोपीने तरुणाची हत्या करून दुसऱ्या ठिकाणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ताम्हिणी घाटात टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान ​माणगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या 6 ते 8 तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!