अन्‌ उसाच्या शेतातून सचिन घायवळ निसटला, पळून जाण्यास महिलेने केली मदत? नेमकं काय घडलं?


पुणे : जामखेड तालुक्यातील एका गावामधील उसाच्या शेतात सचिन घायवळ लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. परंतू पोलिस तेथे पोहचल्याची चाहूल लागताच त्याने शेतातून पळ काढल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात जामखेड तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला असून, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला असताना गावातीलच एका महिलेने सचिनला पोलिस येत असल्याची खबर दिल्याचा संशय आहे. त्यामुळे तो वेळेत सावध होऊन ऊसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी ठरला.

दरम्यान, सचिनला पळून जाण्यास मदत करणारी महिला देखील पोलिसांच्या रडावर आहे. तिला ताब्यात घेऊन पोलिस कसून चौकशी करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तिला ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्याची माहिती आहेत.

सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा मोठा भाऊ आहे. कर्वेनगर व शिवणे भागातील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना अन्नपुरवठा व वाहतूक सेवा देणाऱ्या खासगी कंपनीच्या ४० वर्षीय संचालक महिलेवर ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात निलेश घायवळ, सचिन घायवळ यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, नंतर सचिनवर मकोका कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार आहे.

दरम्यान, निलेश घायवळ हा कोथरूड गोळीबार प्रकरणात तसेच बनावट पासपोर्ट प्रकरणातही फरार असून तो सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!