ऐन निवडणुकीत वाद पेटणार ; ‘बॉम्बे महाराष्ट्राचं शहर नाही’,भाजप नेत्याच वक्तव्य चर्चेत

मुंबई :राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असताना भाजप मोठ्या अडचणीत सापडली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असताना प्रचारात भाजप नेते अण्णामलाई यांनी बॉम्बे महाराष्ट्राच शहर नाही या केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांपैकी सर्वाधिक लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे राजकीय वर्तुळाचा लागला असताना भाजप नेते अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्याने विरोधकांना चर्चेचा विषय मिळाला आहे.मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, या अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर नव्या वादाला तोंड फुटलं असून विरोधकांकडून भाजपला घेरायला सुरुवात झाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अण्णामलाई यांनी मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिनचं सरकार असू शकतं. मोदीजी केंद्रात, देवेंद्र फडणवीस राज्यात आणि मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे. कारण मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही,ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. असं स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद पेटणार आहे.

दरम्यान त्यांचे हे विधान समोर येताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या विधानाचा निषेध केला आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे अत्यंत चुकीचे विधान त्यांनी केलं आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही.” असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.