भाजपची मोठी कारवाई ; ऐन महापालिका निवडणुकीत तब्बल 27 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी


पुणे:राज्यातील २९ महापालिकांमध्ये आपल्या सत्ता येण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रचाराचा धुरळा उडवला आहे. या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना भाजपने मोठी कारवाई केली आहे.ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपनं २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. भाजपनं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकारणासह राज्यातही खळबळ उडाली आहे.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या हायकमांडनं पक्षातील पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी केली आहे.जळगाव महानगरपालिकेत महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक रंजना सपकाळे, कांचन सोनवणे चेतना चौधरी ,जितेंद्र मराठे यांच्यासह भाजपाचे बंडखोर सदस्य यांची पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

ऐन निवडणुकीत भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!