समाधान सरवणकरांची चक्रावणारी संपत्ती, तेजस्वी घोसाळकर, किशोरी पेडणेकरांचीही कोट्यवधींची मालमत्ता; सर्वात श्रीमंत उमेदवारांची यादी समोर…


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागासाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांसह -माजी नगरसेवकांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत.

यात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून माजी महापौर व माजी नगरसेवक कोट्याधीश असल्याची माहिती उजेडात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना स्वतःची, पत्नीची तसेच अवलंबितांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक ठेवी, शेअर्स, दागिने आणि कर्जाची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांत काही माजी नगरसेवकांच्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

घर, फ्लॅट, व्यावसायिक गाळे, भूखंड यासह बँक ठेवी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याची नोंद आहे. काही माजी नगरसेवकांनी उत्पन्नाचे स्रोत व्यवसाय, शेती, भाडे उत्पन्न आणि पगार असल्याचे नमूद केले असले तरी, मालमत्तेतील झपाट्याने झालेली वाढ मतदारांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर- एकूण मालमत्ता – यांची 5 कोटी 26 लाख, 2017 साली – 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये होती.

माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक 202)- एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता : 46 कोटी, विधानसभा निवडणूक 2024 लढवली होती. त्यावेळी एकूण मालमत्ता 44 कोटी होती वाढ : एका वर्षात 2 कोटी

माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. 191)- स्थावर – जंगम मालमत्ता: 21 कोटी 83 लाख 2017 मध्ये : 14 कोटी 37 लाख वाढ : 7 कोटी

यामिनी जाधव (प्रभाग 209)- एकूण मालमत्ता 14 कोटी 57 लाख विधानसभा 2024 लढवली : 10 कोटी 10 लाख वाढ : 1 वर्षात 4 कोटी

नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. 107)- एकूण मालमत्ता : 9 कोटी 2017 मध्ये : 1 कोटी 99 लाख वाढ : 8 वर्षात 7 कोटी

तेजस्वी अभिषेक घोसाळकर (प्रभाग क्र. 2)- एकूण मालमत्ता : 5 कोटी 2017 मध्ये : 25 लाख वाढ : 8 वर्षात 4 कोटी 75 लाख

शैलेश फणसे – एकूण मालमत्ता- 25 कोटी

दीप्ती वायकर- 22 कोटी 1 लाख 71 हजार

समाधान सरवणकर- 46 कोटी 59 लाख, 2017 मध्ये – 9 कोटी 43 लाख

यशवंत किल्लेदार- एकूण मालमत्ता – 7 कोटी 5 लाख

रवी राजा- एकूण मालमत्ता – 10 कोटी 12 लाख 17 हजार, 2017 मध्ये – 5 कोटी 12 लाख 84 हजार

प्रभाकर शिंदे- एकूण मालमत्ता – 17 कोटी 63 लाख रुपये

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!