लोणी काळभोर येथे बारावीच्या विद्यार्थिनीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अटक…


लोणी काळभोर : बारावी इयत्तेत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग व छेडछाड करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पिडीतेच्या ३४ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून वैभव संजय शिरवाळे ( रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आले आहे.

फिर्यादी आपल्या १७ वर्षांच्या मुलीसह लोणी काळभोर परिसरात राहतात. मुलगी लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात बारावीच्या वर्गात शिक्षक घेत आहे.

एके दिवशी शिरवाळे याने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून अल्पवयीन मुलीच्या अकाऊंट वर “मला तुझे बरोबर बोलायचे आहे. असा मेसेज पाठवला. त्यावर मुलीने “तु मला मेसेज करु नकोस. मी तुझ्या चुलत्याला सांगेन” असा मेसेज पाठवला होता.

पिडीत मुलगी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत चालली असताना शिरवाळे हा मंदीराजवळ थांबला होता. त्याने मुलीकडे एकटक पाहुन तिचा पाठलाग केला. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीती असताना सुध्दा आरोपीने तिच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेऊन तीचा विनयभंग केला. सदर बाब पिडीतेने आईला सांगितले नंतर आई मुलीसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आली व फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच वैभव शिरवाळे याला अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, सोमनाथ नाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!