लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता, निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मोठी घोषणा! खात्यात पैसे येणार की रक्कम वाढणार?


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करून रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सरकारला एक वर्ष पूर्ण होऊनही या वाढीबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.

अशातच या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ काही अपात्र महिला घेत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीतील प्रचारसभेत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ठाम घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवून आणल्याचं त्यांनी नमूद केलं. काही लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र अशा खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी चोख उत्तर दिल्याचं शिंदे म्हणाले.

दरम्यान, कोणीही कितीही विरोध केला, तरी लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. निवडणुकीच्या रणधुमाळीत करण्यात आलेल्या या घोषणेमुळे लाडक्या बहिणींमध्ये पुन्हा एकदा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!