पुणे हादरलं! सततची धमकी अन आठ वर्षाच्या चिमुरडीचा वर्षभर अमानुष छळ; आरोपीस बेड्या


पुणे:विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात वारंवार गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता एका ५० वर्षीय नराधमाने आठ वर्षांच्या चिमुरडीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय जाधव (वय ५० )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जाधव हा गेल्या एक वर्षापासून त्या चिमुरडीशी वारंवार लगट करण्याचा प्रयत्न करायचा.तिच्याशी अश्लील कृत्य करत होता. निरागस मुलीला आपल्या सातत्याने धमकावत त्याने तिच्यावर अत्याचार केला.

मात्र, त्याच्या छळाचा अतिरेक झाल्याने आणि सततच्या दहशतीमुळे अखेर तिने आपल्या आईकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीने सांगितल्यानंतर आईने तत्काळ लोणीकंद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.भरवस्तीत एका ज्येष्ठ व्यक्तीकडून चिमुरडीचा असा छळ झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी संजय जाधवला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!