राज्यात खळबळ! राजकीय वादातून काँग्रेस नेत्याची भरचौकात निर्घृण हत्या, भरचौकात धारदार शस्त्राने केले वार…

अकोला : अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी राजकीय वादातून त्यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला होता.

गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर भरचौकात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात घडली. मंगळवारी दुपारी नमाज अदा करून हिदायत पटेल मशिदीबाहेर येत असताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

मरकज मशिदीच्या परिसरात भररस्त्यावरच हल्लेखोराने चाकूने मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी हिदायत पटेल यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने उपचारांचा फारसा उपयोग झाला नाही आणि काही तासांतच त्यांचे निधन झाले.
या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उबेद पटेल नावाच्या संशयिताला अटक केली आहे. उबेद पटेल हा २०१९ मध्ये हत्या झालेल्या भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या राजकीय वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.