भयंकर! नाईट शिफ्टला असताना वॉशरुमला गेला, राऊंड मारताना सिक्युरिटी गार्ड आतलं दृश्य पाहून घाबरला, पुण्यात इंजिनिअरने…

पुणे : पुण्यात आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत आयटी पार्कमध्ये आर्थिक विवंचनेतून एका तरुण ट्रेनिंग इंजिनिअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुजय विनोद ओसवाल (वय.२४) असं मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना काल मंगळवारी मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, सुजय हा नाईट शिफ्टवर कार्यरत होता. कामादरम्यान तो वॉशरूममध्ये गेला, मात्र बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला. त्याचदरम्यान सिक्युरिटी गार्डचा राऊंड सुरू असताना वॉशरूममध्ये सुजयने गळफास घेतल्याचं आढळून आलं.

प्राथमिक तपासात सुजय आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं होतं. याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सुजय २०२४ पासून टीसीएस कंपनीत ट्रेनिंग इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने कुटुंबीयांना पाठवला होता, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.