लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड! दोन महिन्यांचे ३००० एकत्र मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती…


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट ३००० रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. संक्रांतीच्या सणाआधी हा दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे सरकारकडून डिसेंबरचा प्रलंबित हप्ता आणि जानेवारीचा नियमित हप्ता असे दोन्ही मिळून ३००० रुपये एकत्र देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जानेवारीपूर्वी म्हणजेच मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक आधार मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाल्यास महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात DBT माध्यमातून थेट ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. यामुळे गेल्या महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!