मोठी बातमी! मतमोजणीपूर्वीच भाजपचे दोन उमेदवार जिंकले, नेमकं काय घडलं?

कल्याण : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं आहे.

भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दोन जागांवर मतदानापूर्वीच ‘कमळ’ फुलवलं. ‘प्रभाग १८ अ’मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे.