कलाकेंद्रातील नर्तकीच्या प्रेमात ठार वेडा, दोघांच्यातील वाद टोकाला अन उचललं धक्कादायक पाऊल..


बीड : काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी कलाकेंद्रात नृत्यकाम करणाऱ्या पूजा गायकवाड हिच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता धाराशीवच्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यात साई कला केंद्र आहे. येथे एक महिला नृत्यकाम करते. अश्रूबा अंकुश कांबळे नावाचा 25 वर्षीय तरुण या महिलेच्या प्रेमात होता. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. 8 डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येते ते देवदर्शनाला गेले होते. पण परत येताना त्यांच्यात वाद झाला होता.

हा वाद चालू असतानाच मी आत्महत्या करतो म्हणून अश्रूबा यांनी धमकी दिली होती. परंतु प्रेयसी नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तरुणाने चोरखळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या तरुणाचे लग्न झालेले होते. तरीदेखील तो कलाकेंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या प्रेमात पडला होता.

ही घटना समोर येताच येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे असून पंचनामा केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या नर्तकी महिलेने अश्रूबा कांबळे यांना त्रास दिला होता का? याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेनंतर धाराशीवमध्ये खळबळ उडाली असून तपासात कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!