मोठी बातमी! बँकिंगपासून पेन्शनपर्यंत, 1 डिसेंबरपासून देशात होणार बदल,प्रत्येक खिशावर थेट परिणाम

पुणे : दर महिन्याच्या एक तारखेपासून काही नियमांमध्ये बदल होत असतात.त्याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारावर थेट परिणाम होत असतो. आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या एक तारखेपासून असेच काही नियम लागू होणार आहेत. यामधील प्रमुख बदल पुढीलप्रमाणे.

1. सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल
दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्यांकडून सीएनजी, जेट फ्युएल, पीएनजीच्या किमतींमध्ये बदल केला जातो. १ डिसेंबरपासून या किमती पुन्हा बदलू शकतात. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.

2.एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल
सरकारकडून दर महिन्याला एलपीजीच्या व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल केला जातो. आता डिसेंबरपासूनही एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. गेल्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये ५ रुपयांनी घट झाली होती.
3.पेन्शन स्कीम आणि जीवन प्रमाणपत्राशी संबंधित बदल
निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व ज्येष्ठांसाठी डिसेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक निवृत्तीवेतन धारकाला जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास जानेवारी महिन्यापासून निवृत्तीवेतन बंद होईल. मात्र आता हे काम घरबसल्या होणार आहे. तसेच त्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्टामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
4.ऑनलाईन बँकिंग
१ डिसेंबरपासून अनेक बँका आणि वित्तिय कंपन्यांनी आपल्या ऑनलाईन बँकिंग, यूपीआय, गुंतवणूक आणि कार्डशी संबंधित काही नियम बदलले आहेत. आता तुमचं खातं हे आधीपेक्षा अधिक सुरक्षित असेल. काही बँका क्रेडिट कार्ड-डेबिट कार्डवरील आकारसुद्धा वाढवू किंवा कमी करू शकतात. याचा अर्थ देवाण घेवाणीवर थोडा अधिक कर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेकडून येणाऱ्या संदेशावर लक्ष ठेवा.
5.इन्कमटॅक्स फायलिंगची तारीख
प्राप्तिकरासंबंधी आवश्यक फायलिंग करण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर आहे. त्यामध्ये कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४एम आणि १९४एस अंतर्गत ऑक्टोबर महिन्याक करण्यात आलेल्या कपातीचं टीडीएस विवरण जमा करण्याचा समावेश आहे. तसेच ज्या कंपन्या आणि लोकांवर ट्रान्सफर प्रायसिंग नियम लागू होतात, त्यांनाही कलम ९२ई चा अहवाल याच दिवसापर्यंत फाईल करावा लागेल.
6.आधारकार्ड अपडेट सोपं
आधारकार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक यासारखा वैयक्तिक तपशील पूर्णपणे ऑनलाईन अपडेट करता येईल. नवीन प्रक्रियेतंर्गत पॅनकार्ड आणि पासपोर्ट सारख्या संबंधित सरकारी नोंदींद्वारे माहितीचा पडताळा करतील. यामुळे नागरिकांना अपडेटसाठी प्रत्येकवेळी पोस्टात अथवा केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही.
6.जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संधी
केंद्राने प्रत्येक पेन्शनधारकाला जीवन प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे केले आहे. यंदा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अखेरची तारीख ही 30 नोव्हेंबर ही आहे. परिणामी 1 डिसेंबरपासून पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार नाही.
प्रत्येक नवीन महिन्यात काही ना काही आर्थिक बदल होताना दिसत आहेत. उद्यापासून डिसेंबर महिना सुरु होत आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेला, 1 डिसेंबर रोजी अनेक मोठे बदल दिसतील. त्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल.
