पुण्यातील चाकणमध्ये कंटेनरला भीषण आग ; 40 नव्या कोऱ्या दुचाकी जळून खाक


पुणे : पुण्यातील चाकणमध्ये पेट्रोल पंपाच्याजवळ पहाटेच्या वेळी डिझेल भरण्यासाठी आलेल्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या आगीत कंटेनरमधील 40 नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्यात. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण रस्त्यावर खराबवाडी गावातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कंटेनर डिझेल भरण्यासाठी आला होता. यावेळी कंटेनर चालकाने डिझेल भरण्यासाठी मालकाला फोन केला होता. मालकाने फोन न उचल्याने कंटेनर पेट्रोल पंपाच्या बाजूला पार्क केला.त्यानंतर काही वेळात एका रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने चालकास कंटेनर मधून धूर येत असल्याची माहिती दिली.त्यावर चालकाने कंटेनरचा मागील दरवाजा उघडला असता आगीचे लोळ बाहेर पडले. यात 40 इलेट्रिकल दुचाकी होत्या.त्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान घटनास्थळी तातडीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्यासह अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टाळला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!