लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली सर्वात मोठी घोषणा..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना राबवली जात असून दर महिन्याला महिलांच्या खात्यात ₹ १,५०० थेट जमा होतात. निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना अल्पावधीतच महिला वर्गात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.


या योजनेबाबत विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येत होते की लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे. यावर वाशिममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत मोठी घोषणा केली.

विरोधक म्हणत होते लाडकी बहीण योजना आता बंद होईल, मात्र एक वर्ष पूर्ण झालं आणि जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहणार नाही तर त्या लखपती दीदी बनणार आहेत.

आम्ही आत्तापर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत, आणखी ५० लाख लखपती दिली तयार करायच्या आहेत, अशी मोठी घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
