२ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठा निर्णय

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि महापालिकांच्या आगामी निवडणुका बाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचे सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने 57 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची याचिका फेटाळून लावली आहे.

त्यानुसार आता येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी नगरपरिषद आणि नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्यात सरकारी सुट्टी जाहीर…


पुणे जिल्ह्यात, आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.
मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. येत्या २ डिसेंबर रोजी केंद्र सरकारची कार्यालये, निमसरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादी ठिकाणी सार्वजनिक सुट्टी लागू राहील, पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे..
२ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शक्य तितक्या मतदारसंघांमध्ये निवडणुका घेतल्या जातील. त्या मतदारसंघात सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बँका आणि सरकारी कार्यालये बंद राहतील. त्यामुळे तुमचे २ डिसेंबरला बँकेत काही काम असेल तर जाऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची अंतिम मुदत वाढवली आहे. आता १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपात्र आणि उमेदवारांना उशिरा चिन्ह मिळालेल्यांना दिलासा मिळणार आहे. आता उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचार करता येणार आहे.
