डार्क चॉकलेट खातायं? तर जाणून घ्या ६ आश्चर्यचकित करणारे फायदे…

पुणे : आहारात आपण काही खास पदार्थांचा समावेश केला तर अनेक गंभीर आजार सहज दूर ठेवता येऊ शकतात. अशाच काही महत्वाच्या पदार्थांपैकी एक आहे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रोटीन शेक म्हणून सुद्धा याचा वापर करता केला जातो.

तसेच केकमध्ये सुद्धा हे वापरले जाते. पण तज्ञांच्या मते, जर डार्क चॉकलेट रोज एक छोटा तुकडा खाल्ला, तर शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. डार्क चॉकलेटमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, लोह, मॅंगनीज आणि पोटॅशियम यांसारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
पोषणतज्ञ यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये दररोज डार्क चॉकलेट खाण्याचे आश्चर्यकारक फायदे सांगितले आहेत. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उर्जा, त्वचेला पोषण आणि मनाला शांतता देण्यासाठी डार्क चॉकलेटचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो.

डार्क चॉकलेटचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचेवरील चमक. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात, ज्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा, निस्तेजपणा कमी होतो. दररोज एक तुकडा खाल्ल्यास त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग दिसते.
दुसरा फायदा म्हणजे मूड सुधारणा. चॉकलेट खाल्ल्यानंतर आनंदी वाटतं, कारण त्याने सेरोटोनिनची पातळी वाढते. सेरोटोनिन म्हणजे आनंदाचे हार्मोन. त्यामुळे दिवसभराचा ताण कमी होतो आणि मन उत्साही राहते. तणावाच्या काळात डार्क चॉकलेट मनाला शांत करणारं नैसर्गिक उपाय ठरू शकतं.
तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य मजबूत होणे. डार्क चॉकलेट रक्तप्रवाह सुधारते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो. हिवाळ्यात विशेषत: रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, अशावेळी डार्क चॉकलेट शरीरासाठी सहाय्यक ठरते.
चौथा फायदा म्हणजे तणाव कमी होणे. यात असलेले घटक कॉर्टिसोल पातळी कमी करण्यास मदत करतात. कॉर्टिसोल हा तणाव वाढवणारा हार्मोन असल्याने त्याची पातळी नियंत्रित राहिल्यास मानसिक आरोग्य सुधारते.
पाचवा मोठा फायदा म्हणजे वजन नियंत्रण. पोषणतज्ञांच्या मते, डार्क चॉकलेटमुळे साखरेची इच्छा कमी होते. जे लोक वारंवार गोड खाण्याकडे वळतात, त्यांच्यासाठी डार्क चॉकलेट उपयोगी ठरते. हे जास्त खाण्याची सवय कमी करून वजन नियंत्रणात ठेवते.