उरुळीकांचन येथे दारुड्याला हटकल्याने दुकानदाराला भोसकले, आरोपीला पोलिसांकडून अटक…


उरुळी कांचन : दुकानापुढे गोंधळ घालत बसत जावु नये असे म्हणल्याच्या कारणावरून उरुळी कांचन येथे शिवीगाळ दमदाटी करून दुकानदारावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

ही घटना मंगळवारी (ता. 25) रोजी रात्री 08:00 वाजण्याच्या सुमारास मौजे उरुळी कांचन गावच्या हद्दीत तुपेवस्ती येथे प्रिन्स जनरल स्टोअर्सच्या समोर घडली आहे.

याप्रकणी बाळासाहेब नारायण तुपे (वय. 66 वर्ष व्यवसाय शेती / जनरल स्टोअर्स रा. तुपेवस्ती उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे ) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून स्वप्निल बाळु ओव्होळ (रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मौजे उरुळी कांचन गावचे हद्दीत तुपेक्स्ती येथे माझे प्रिन्स जनरल स्टोअर्सच्या समोर आरोपी स्वप्निल बाळु ओव्होळ गोंधळ घालत होता. त्यांना फिर्यादी यांचा भाऊ प्रभाकर नारायण यांनी दुकानापुढे गोंधळ घालत बसत जावु नका असे सांगितले.

त्यावरून आरोपी स्वप्निल ओव्होळ याला राग आला त्याने फिर्यादी यांच्या भावाला शिवीगाळ दमदाटी करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार चाकुने पोटात तसेच हातावर वार करून जिये ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, याप्रकणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!