वाघोली पोलीस ठाण्यात ५ हजारांची लाच मागणारा पोलीस हवालदार ‘लाचलुचपत’च्या जाळयात, घटनेने खळबळ…


वाघोली : न्यायालयाने पोटगी देण्याचे आदेश दिले असतानाही पोटगी देत नसल्याबाबत वॉरंट काढले होते. हे वॉरंट बजावणीसाठी गरीब महिलेकडे ५ हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच घेताना रंगेहाथ पकडले.

अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांच्या पथकाने वाघोली पोलीस स्टेशनमध्ये लाच मागणी व स्वीकार प्रकरणात मोठी कारवाई करत पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे.

ही कारवाई दि. 25/11/2025 रोजी घडली आहे. तक्रारदार महिलेने (वय. 33), आपल्या तक्रारीत हवालदार परमेश्वर मानिक माखरे (वय. 37) यांनी वारंवार 5,000 रु. लाचेची मागणी केल्याचा आरोप केला होता.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस हवालदार परमेश्वर पाखरे हा वाघोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. महिलेला पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता़ तरी तिच्या पतीने पोटगी दिली नव्हती. त्यामुळे तिने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने वॉरंट काढले होते. हे वॉरंट बजावणीचे काम हवालदार परमेश्वर पाखरे याच्याकडे दिले होते. त्याने हे वॉरंट बजावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

आधीच पोटगी थकलेली, त्यात त्याचे वॉरंट बजावण्यासाठी लाच मागत असल्याने या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यावर हवालदार पाखरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी सकाळी सापळा लावला. पोलीस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीवर तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना परमेश्वर पाखरे याला पकडण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!