……तर मी अनंत गर्जेला माफ करेन’, गौरीच्या मृत्यूनंतर आई असं का म्हणाली?

पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरात आत्महत्या केली. या प्रकरणानंतर गौरीच्या कुटुंबीयांनी आरोपी अनंत गर्जे याच्यासह दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे. तसेच अंनतने खरं बोललं तर मी त्याला माफ करेन पण तू खरं बोल. मला खोटं बोलणारे आवडत नाही. हा भामटा वकील लावून खोटं बोलतो, अशी खंत गौरीच्या आईने बोलून दाखवली आहे.

गौरीच्या आत्महत्येबाबत तिच्या आईने संशय व्यक्त केला आहे. गौरीने आत्महत्या केली असेल तर अनंतने तिचा मृतदेह तसाच ठेवायला हवा होता. त्याने मुलीला हात कसा काय लावला? तो डॉक्टर होता का? माझी मुलीने आत्महत्या केली होती, तर आम्ही येईपर्यंत त्याने मुलीला तसंच ठेवायला हवं होतं,. शिवाय गौरीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या प्रकाराबद्दल पंकजा मुंडे यांची बोलणे केले का यावर गौरी गर्जे यांच्या आई म्हणाल्या, आम्ही त्यांच्याशी संपर्क का करावा? आमचं लेकरू गेलंय, तुम्हाला मुलगा जवळचा की सून… मला यावर काहीच बोलायचं नाही, पण माझ्या लेकराला मारलं. मला न्याय पाहिजे, मला या तिघांना शिक्षा झालेलं बघायचं आहे. मी एकालाही सोडणार नाही. असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
