ब्रेकिंग! अनंत गर्जेचा खेळ खल्लास, डॉक्टर गौरीच्या वडिलांनी घेतली आणखी दोन नावं, केली मोठी मागणी ?


पुणे : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी विविध खुलासे समोर येत आहेत.गौरी पालवे यांच्या मृत्यूबाबत गंभीर शंका व्यक्त करत नातेवाईकांनी वरळी येथील असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस कार्यालयात लेखी निवेदन सादर केले आहे. अर्जदार अशोक मारुती पालवे आणि त्यांची पत्नी अलकनंदा अशोक पालवे यांनी दिलेल्या तक्रारीत अनंत गर्जे, अजय,गर्जे, शितल आंधळे हे तीन जण गौरीच्या मृत्यूपूर्वी सतत संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे सदर घटनेनंतर या तिघांनी आपापले मोबाईल बंद केल्याने संशय अधिक वाढला असून त्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी, या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे पोलिसांनी लक्ष द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. गौरी यांच्या मृत्यूच्या दिवशी 22 नोव्हेंबर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत त्या राहत असलेल्या इमारतीतील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वार येथील CCTV फुटेज जप्त करून तपासात समाविष्ट करण्याची विनंती अर्जदार अशोक मारुती पालवे आणि त्यांची पत्नी अलकनंदा अशोक पालवे,अर्जदारांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून नातेवाईकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.तक्रारीनुसार डॉ. गौरी पालवे यांच्यासोबत तीन व्यक्ती अनंत गर्जे, अजय गर्जे आणि शितल आंधळे हे त्यांच्या मृत्यूपूर्वी सतत संपर्कात होते. या तिघांकडून मानसिक छळ होत असल्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे

दरम्यान आरोपपत्रात उल्लेख असलेल्या अजय गर्जे आणि शितल आंधळे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. अजय गर्जे आणि शितल आंधळे दोघंही अजूनही मोकाट आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!