भाजपमध्ये भूकंप ; ५० पदाधिकाऱ्यांसह निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजीनामा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?


पुणे: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजपमध्ये मोठा भूकंप आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या ५० पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. अशातच भाजपच्यां पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.नाराजीतून त्यांनी पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना (शिंदे सेनेची)युती झाली होती. भाजपला १५ ते २० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, केवळ चारच जागा मिळाल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आली. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहे. यामुळे भाजपच्या गटात नाराजी अधिक वाढली आहे.दरम्यान, आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप पक्ष सोडण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे.

. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ न शकल्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी भाजप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अन्याय आणि पक्षाच्या संघटनात्मक दुर्लक्षाचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे मनमाडमधील भाजपची पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!