डॉ. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी करुणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट, रात्री बारा वाजता त्यांचा फोन…….

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत
गर्जेच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवी -गर्जे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.अशातच आता करुणा मुंडे यांनी या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.गौरी यांची ज्यादिवशी हत्या झाली, त्या दिवशी मलाही रात्री 12 च्या दरम्यान फोन आला होता, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. वरळीच्या आदर्श नगर येथील ‘महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी’मधील राहत्या घरी गौरी पालवे- गर्जे यांनी गळफास लावून घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. गौरी हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय गौरीच्या माहेरच्या मंडळींनी बोलून दाखवला. यावर करून मुंडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.मला फोनवर गौरीच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की, पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत. मग तेव्हा मी सांगितलं की मला पोलिसांशी बोलणं करुन द्या, मी त्यांना तक्रार दाखल करुन घ्या असं सांगितलं होतं, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली. या प्रकरणामागे कोण कोण आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात महिलांची काय अवस्था आहे, हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी दिसत आहे.

दरम्यान बीडमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट आहे की शाररिक, मानसिक आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरीही शासन काही दखल घेत नाही. ही आत्महत्या नसून हत्या आहे, असं करुणा मुंडे यांनी सांगितलं. मी कुटूंबियांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या प्रकरणात आता आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.