भाजप नेत्याच्या सासऱ्यांबाबत ससूनमधून धक्कादायक खुलासा; बॉडीवर बेवारस समजून अंत्यविधी अन…..,


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात घडणाऱ्या घटना नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. ससून रुग्णालयात उपचार करण्यात आलेले प्रकाश पुरोहित हे बेपत्ता असल्याची ओरड झाल्यानंतर त्यांचा मृत्यू आठ महिन्यांपूर्वीच झाला आणि त्यांच्या पार्थिवावर बेवारस व्यक्ती म्हणून अंत्यसंस्कारही झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांचें सासरे प्रकाश पुरोहित ससून रुग्णालयात उपचारासाठी सप्टेंबर 2024 मध्ये दाखल झाले होते. डिसेंबर 2024 पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर त्यांना दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवण्यात आले, मात्र त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार केली होती.परंतु गायकवाड यांनी रुग्णाला १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा ससूनमध्ये दाखल केले होते. त्यानंतर सात मार्च रोजी त्यांचा रुग्णाचा मृत्यू झाला.मात्र त्यांच्या प्रकृती विषयी कोणती सुधारित माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली नसल्याच पदाधिकाऱ्यांनीं म्हटलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यापासून आम्हाला कुठलीही माहिती पुरवली गेली नाही असा आरोप तुळजापूरकर यांनी केला आहे.त्यांच्या शोधासाठी ससून रुग्णालयच्या प्रशासनाला पत्र पाठवले होते. गेली दोन महिने पुरोहित यांचा शोध घेण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार प्रसारमाध्यमांनी उजेडात आणल्यानंतर पोलिस प्रशासनासह ससून रुग्णालयाने पुरोहित यांचा शोध सुरू केला होता.

दरम्यान पुरोहित यांच्या पत्नीला शुक्रवारी बंडगार्डन पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. पुरोहित यांची ‘बेवारस मृत्यू’ म्हणून नोंद करताना काढलेली छायाचित्रे त्यांना दाखविण्यात आली. यावरून पत्नीने त्यांची ओळख पटविली. या प्रकरणी बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटल्याचा अहवाल ससून रुग्णालय प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे.दरम्यान वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने शुक्रवारी विभागप्रमुख, डॉक्टर, वैद्यकीय अधीक्षक, समाजसेवा विभाग यासह संबंधित १७ कर्मचाऱ्यांची समितीने चौकशी करून जबाब नोंदविले. सरकारला सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्यात येणार आहे. यामध्ये आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!