धक्कादायक! 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर बिबट्याची झडप; धाडशीपणानं दप्तरच बनलं’ लाईफसेव्हर’


पालघर : पालघरमधील विक्रमगड तालुक्यातील 11 वर्षीय विद्यार्थ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.मयंक विष्णू कुवरा हा विध्यार्थी शाळेसाठी रोज 8 किलोमीटरची पायपीट करतो. या शाळेचा रस्ता जंगलातून जातो.संध्याकाळी शाळा सुटल्यावर तो पडवीपाडा या त्याच्या वस्तीकडे परतत होता. तेव्हा झाडीत दडलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.

समोर आलेल्या माहितीनुसार, आहे.मयंक विष्णू कुवरा याच्यावर अचानक झालेल्या हल्ल्याने तो भांबावला. हा विद्यार्थी जंगलातील रस्त्याने त्याच्या शाळेत जातो. घरापासून त्याची शाळा 4 किलोमीटर आहे. जंगलातील पायवाटेने तो रोज शाळेत जातो. शाळा सुटल्यावर तो घरी परतत होता. त्याचवेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. पण शाळेचे दप्तर आणि विद्यार्थ्याच्या समयसूचकतेमुळे तो बचावला. बिबट्याने मागून त्याच्यावर हल्ला चढवला. मयंकच्या पाठीवर दप्तर होते. बिबट्याचे पुढचे पाय या दप्तरावर पडले. यामुळे त्याची पाठ वाचली. पण हातावर बिबट्याच्या पंजामुळे खोल जखमा झाल्या. त्याच्या हाताला अनेक ठिकाणी टाके द्यावे लागले. बिबट्याच्या अणुकुचीदार नखामुळे त्याचे हात सोलपटून निघाले.मात्र अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मयंक घाबरला नाही. त्याने समयसूचकता दाखवली. त्याच्या धाडसीपणामुळे बिबट्याने धूम ठोकली.

दरम्यान मयंकच्या आवाजामुळे आणि दगडांच्या माऱ्यामुळे बिबट्या घाबरला आणि त्याने जंगलाकडे धूम ठोकली. मुलांचा आरडाओरड ऐकून काही गुराखी आणि जवळपासच्या लोकांनी धाव घेतली.. मुलांच्या या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले. तर या बिबट्यासाठी लवकर वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी केली. मयंकला तातडीने विक्रमगड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे त्याच्या हातावर टाके घालण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!