निवडणुकीआधीच अजित पवारांचा मोठा विजय! ‘एवढे’ नगरसेवक बिनविरोध विजयी…

बारामती : बारामती नगरपालिकेतील अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राज्यात राजकीय घडामोडींन वेग आला आहे. उमेदवारांमध्ये चढओढ पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी पक्षांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

तर दुसरीकेड बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीच्या रणधुमाळीकडे लागले आहे. दरम्यान, बारामतीत निवडणुकीआधीच अजित पवारांना मोठे यश मिळाले आहे.
नगरसेवक पदाच्या आठ जागा अजित पवार गटाच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बारामती नगरपरिषद निवडणुकीकरिता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता ३०० हून अधिक विक्रमी अर्ज दाखल झाले होते. पालिका निवडणुकीमध्ये अपक्षांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७७ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तर नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असणाऱ्या दोन सदस्यांनी आपली उमेदवारी मागे घेतले आहेत. त्यामुळे, अजित पवार गटाला मोठे यश मिळाले असून निवडणुकीपूर्वीच आठ नगरसेवक निवडून आले आहेत.
कोणत्या प्रभागातून कोण निवडून आले?
प्रभाग क्रमांक 2 अ मधून अनुप्रिति तांबे
प्रभाग क्रमांक 5 अ मधून किशोर मासाळ
प्रभाग क्रमांक 6 अ मधून अभिजीत जाधव
प्रभाग क्रमांक 8 अ मधून श्वेता नाळे
प्रभाग क्रमांक 17 ब मधून शर्मिला ढवान
प्रभाग क्रमांक 20 ब मधून आफ्रिन बागवान
प्रभाग क्रमांक 18 अ मधून अश्विनी सुरज सातव
प्रभाग क्रमांक 2 ब मधूनअनुप्रिता रामलिंग तांबे डांगे