पुण्यात भाऊच निघाला वैरी ; चुलत भावाची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला अन….


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वृत्तीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.या पुण्यामध्ये भावानेच भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे. चुलत भावाने भावाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून फेकून दिल्याचा प्रकार कात्रज गुजरवाडीमध्ये समोर आला आहे. जुन्या वादातून हे ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अशोक पंडित असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली.अशोक पंडित याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता. मृत पावलेला तरुण आणि आरोपी दोघेही चुलत भाऊ असून झारखंड येथील राहणारे आहेत. अंतर्गत वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

गेल्या तीन आठवड्यात पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई करत 11 पेक्षा जास्त पिस्तुल जप्त केल्या आहेत. पुण्यातील काळेपडळ,कोंढवा आणि इतर ठिकाणी छापेमारी करत पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. पुणे शहरात अजूनही अशा प्रकारची कारवाई सुरू आहे.. शहरात खून,मारामारी याचे प्रकार वाढले त्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!