लोणी काळभोर येथे सापडला ‘एमडी’ ड्रग्ज, पोलिसांनी एकला ठोकल्या बेड्या, उडाली खळबळ..


लोणी काळभोर : येथे एकाकडे ७ ग्रॅम ९९ मिलीग्रॅम वजनाचा ‘एमडी’ ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाला सापडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग परिसरात बुधवारी (ता.१९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक करून सुमारे २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अफसर अहेसान अंन्सारी (वय ३१, रा. पाषाणकर बाग, गैस एजन्सी शेजारी लोणी काळभोर, ता हवेली, जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन मारूती मुंढे (वय 38 ) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुन्हे शाखा युनिट ६चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पथकाला एक व्यक्ती लोणी काळभोर येथील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन नाव विचारले असता. त्याने त्याचे नाव अफसर अहेसान अंन्सारी असे सांगितले.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख ८० हजार ९२० रुपये किंमतीचे 7 ग्रॅम ९९ मिलीग्रॅम वजनाचा ‘एमडी’ ड्रग्ज व २० हजार किंमतीचा मोबाईल, लेक्ट्रीक वजनकाटा, पिशवी, चमचा, झिप-लॉक पादर्शक १७ रिकाम्या पाउच असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस हवालदार नितीन मुंढे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अफसर अंन्सारी याच्यावर एन.डी.पी. एस. ॲक्ट कलम 8 (क), 21(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!