मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? नेमकं कारण काय?..


पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव़डणुकांवरील अनिश्चितता अद्यापही कायम आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर आता २५ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा करू नये, अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 50% ची मर्यादा ओलांडता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.या वादामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत निवडणुका जाहीर करू नयेत, असे निर्देश दिले आहेत.दरम्यान, याचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होत असून, आगामी निवडणुका कधी जाहीर होतील? याबाबतची स्थिती अद्याप धूसरच आहे.

दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्राम पंचायतींमध्ये आरक्षणाती मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!