बिबट्याचे हल्ले वाढले, हल्ला झालाच तर वाचायचं कस? जाणून घ्या महत्वाची माहिती…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बिबटे आढळून येत असल्याने लहान मुलांना शाळेत जाणे देखील अवघड झाले आहे. विविध भागांमध्ये सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येत आहे.

सध्या बिबट्या नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचं दिसून येत आहे, अनेकदा तो आपली शिकार समजून माणसांवर हल्ले करत आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागांमध्ये घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना या बिबट्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भर वस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. या घटनेनं शहरात मोठी दहशत निर्माण झाला. वनविभागाने हा बिबट्या जेरबंद केला. या घटनेत एका वनविभागाच्या अधिकाऱ्याला देखील दुखापत झाली.

यामध्ये वाचायचं असल्यांस बिबट्या दिसल्यास पळू नका कारण बिबट्या हा तुमच्यापेक्षा जोरात पळू शकतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या दिशेनं बिबट्या येताना दिसला तर हात वर करून जोरजोरात ओरडा. त्यामुळे समोर असलेला प्राणी हा आपल्या पेक्षा मोठा आहे, असा बिबट्याचा समज होतो आणि तो तुमच्यापासून लांब निघून जाईल.

कधी बिबट्या दिसला तर खाली वाकू किंवा बसू नका. त्यामुळे समोर दिसत असलेला प्राणी हा आपल्यापेक्षा लहान आहे, असा त्याचा समज होतो. दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील यावर लवकरात लवकर उपाय योजना करणे गरजेचे आहे. अनेकांनी या हल्ल्यात आपले जीव गमावले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!